*💫वेंगुर्ले दि.०२-:* राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती सिंधुदुर्गतर्फे शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला दोन प्राण वायु मशीन भेट देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती जिल्हा सिंधुदुर्ग तर्फे प्राणवायू योजनेअंतर्गत सेवा इंटरनॅशनल यांच्या माध्यमातून शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला दोन प्राणवायू मशीन देण्यात आल्या असून त्या मशीन चा शुभारंभ शिरोडा रुग्णालयातील कोविंड सेंटरमध्ये करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूच्या महामारी ने कहर केला आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. या रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे. ही ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन त्यासाठी सदरची गरज भागविण्याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती प्राणवायू योजनेअंतर्गत सेवा इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालय शिरोडा येथे दोन प्राणवायू मशीन देण्यात आल्या. यावेळी संघाचे सागर रेडकर, मंदार बागलकर, महादेव मराठे, डॉ. देसाई, डॉ.नवांगुळ, अमित नाईक, अविनाश पाटील व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. उपजिल्हा रुग्णालय शिरोड्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दोन प्राणवायू मशीन दिल्याबद्दल रुग्णालयाच्या वतीने कार्यकर्त्यांचे आभार डॉक्टर यांनी मानले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शिरोडा उपजिल्हा रुग्णालयास प्राण वायू मशीन भेट
