तौक्ते चक्री वादळामुळे नुकसान झालेल्या आपदग्रस्तांना १०० टक्के मदत करण्यात यावी…

भाजप सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते श्री बाबा मोंडकर यांनी केली मागणी

*💫मालवण दि.०२-:* तौक्ते चक्री वादळामुळे नुकसान झालेल्या आपदग्रस्तांना सत्तेतील दोन्ही आमदार व या जिल्ह्याच्या पालकमंत्री श्री उदय सामंत यांनी लक्ष देऊन नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसानीच्या १०० टक्के मदत करण्यात यावी, अशी मागणी भाजप सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते श्री बाबा मोंडकर यांनी केली आहे. मोंडकर म्हणाले, तौक्ते वादळाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार, व्यापारी, मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक उध्वस्त झाला आहे. आघाडी सरकारने जी मदत जाहीर केली आहे ती तुटपुंजी आहे मंजूर झालेली शासकीय मदत बघता मिळणारी मदत ही नुकसानग्रस्तांची चेष्टा करणारी आहे. सत्तेतील आमदार श्री वैभव नाईक वादळ झाल्यानंतर मालवण कुडाळ मध्ये गरागरा फिरले वाटले की जनतेला भरीव मदत मिळेल पण दोनच दिवसांनी समजले की ही सगळी धडपड भगव्या रंगाच्या ताडपत्री विकून दलाली कमावण्यासाठी होती. कित्येक कामे स्थानिकांनी केली ती आपण केली म्हणून सांगण्याची धडपड चालू होती. त्यात सिंधुदुर्ग किल्यांवरील महाराजांच्या मंदिरावर पडलेला वड हा स्थानिक रहिवासी व एका धर्मदाय संस्थेने स्वखर्चाने काढून घेतला, त्याचेही श्रेय हे आमदार महाशयांनी आपल्या नावाने घेतले. वास्तविक या जिल्ह्यांने शिवसेनेला खासदार व दोन आमदार दिले. त्यांनी मंत्रालय स्तरावर पक्षाच्या मुख्यमंत्र्यांसमोर आपले राजकीय वजन वापरून जनतेच्या नुकसानीची १०० टक्के भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. सुपारी, माडाच्या झाडाला अनुक्रमे ५० रुपये व २५० रुपये मंजूर करण्यात आले आहेत, यापेक्षा कित्येक पटीने ही झाडे तोडण्यासाठी खर्च आला आहे. मोडलेल्या, नुकसान झालेल्या घर, मांगर, झोपडी च्या झालेल्या नुकसानीच्या जेमतेम ५ टक्केपेक्षा कमी मदत शासनाकडून मंजूर झाली आहे. पर्यटन व्यावसायिकांच्या हॉटेल, घरमध्ये पाणी घुसून टीव्ही, फ्रीज, हॉटेल सामान, कंपाऊंड वाँलच्या शप्पराचे तसेच जलक्रिडाच्या होड्याच्या झालेल्या नुकसानीच्या १ रुपया पण मंजूर झाला नाही आहे. तौक्ते वादळाचा रूद्रावतार बघता मालवण तालुक्यात देवबाग व तळाशील येथे नारायण राणे यांच्या दूरदृष्टीच्या माध्यमातून समुद्रकिनारी बांधलेल्या बंधाऱ्यामुळे या भागातील मच्छीमार वस्ती वाचू शकली. मच्छीमारानांही मंजूर नुकसानीची भरपाई अत्यल्प आहे. या सर्व वास्तवतेकडे सत्तेतील दोन्ही आमदार व या जिल्ह्याच्या पालकमंत्री श्री उदय सामंत यांनी लक्ष देऊन नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसानीच्या १०० टक्के मदत करण्यात यावी, अशी मागणीही मोंडकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page