दाभोळे येथील विलगी करण कक्षाचे उद्घाटन

पंचायत समिती सभापती रवी पाळेकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

देवगड-प्रतिनिधी ग्रामपंचायत दाभोळेच्यावतीने गावामधील दाभोळे शाळा नं1 येथे कोरोना संस्थात्म्क विलगीकरण कक्षाचे उदघाटन पंचायत समिती सभापती रवि पाळेकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब,विस्तार अधिकारी अंकुश जंगले,निलेश जगताप,समिर होडावडेकर,सरपंच रश्मी मयेकर,पंचायत समिती सदस्या प्राजक्ता घाडी,उपसरपंच अनुश्री दाभोळकर,ग्रामसेवक प्रदीप नारकर,तलाठी कदम,डॉ.प्रितेश साळवी,आरोग्यसेवक खेडेकर,माजी सरपंच अनभवणे,ग्रामपंचायत सदस्य्‍,आशा स्वयंसेविका,कृषी सहा. दळवी,ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ,केंद्रप्रमुख लांबोरे,पांडुरंग घाडी,मयेकर आदी उपस्थित होते. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठयाप्रमाणात प्रसार असून शासन आदेशाप्रमाणे देवगड तालुक्यामधील दाभोळे गावामध्ये शाळा नं 1 च्या ईमारतीमध्ये 10 बेडचे संस्थात्म्क विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला.सदर कक्षात गावमर्यादीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ठेवण्यात येणार आहेत. सदर 10 बेड हे ग्रामस्थांच्या सहकार्यातून देण्यात आलेले आहेत. ग्रामपंचायतीच्यावतीने सदर कक्षामध्ये वाफेची मशीन,सॅनिटायझर,हॅन्डवॉश,कचरा कुंडी प्रत्येक बेडला ठेवण्यात आली आहे.तसेच सदर कक्ष महिलांसाठी व पुरुषांसाठी वेगवेगळा अशी रचना ठेवण्यात आली आहे. आंघोळीकरीता गरम पाण्याची सोय तसेच पिण्यासाठी गरम पाणी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बाथरुमची,शौचालय तसेच स्नानगृहची व्यवस्था,इंटरनेटची व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच गावातील स्वयंसेवका मार्फत नियंत्रण कक्ष उभारण्यात आलेले आहे.या सर्व नियोजनाबाबत गावचे सरपंच तसेच नियंत्रण समितीचे व ग्रामस्थांचे विशेष कौतुक पंचायत समिती सभापती रवि पाळेकर व गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी उदघाटन प्रसंगी केले. तसेच अशा प्रकारचा संस्थात्म्क विलगीकरण कक्ष स्थापन केल्याबददल ग्रामस्थांमधून देखील समाधान व्यक्त करण्यात येत आहे. फोटो- दाभोळे शाळा नं1 येथे कोरोना संस्थात्म्क विलगीकरण कक्षाचे उदघाटन करताना सभापती रवि पाळेकर बाजूला गटविकास अधिकारी जयप्रकाश परब,दाभोळे सरपंच रश्मी मयेकर विस्तार अधिकारी,ग्रामसेवक आदी   

You cannot copy content of this page