*💫बांदा दि.०१-:* बांदा – पत्रादेवी चेकपोस्टवर गोव्यातून पुणेकडे जाणार्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात बांदा पोलीसांनी मंगळवारी कारवाई केली. या कारवाईत ५ लाख १९ हजार रुपयांच्या दारु, १८ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईलसह एकूण १० लाख ३७ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बेकायदा दारु वाहतुकप्रकरणी विलास प्रल्हाद राखपत्रे (३६, रा. सोमेश्वरवाडी पुणे ) व भावेश गबा पाटील (रा. पुणे) यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी सकाळी बांदा सटमटवाडी चेकपोस्टवर करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्यातून येणारा महिंद्रा बोलेरो टेम्पो (एमएच १४ एचयू ४९४६) तपासणीसाठी थांबविण्यात आला. यावेळी टेम्पोत मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा दारुसाठा आढळून आला. टेम्पोत तब्बल ५ लाख १९ हजार १२० रुपयांची दारु, १८ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल व ५ लाख रुपयांचा टेम्पो असा एकूण १० लाख ३७ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद, पोलीस काँस्टेबल धनंजय गोळे, धुरी यांनी केली.
बांदा पोलीसांच्या कारवाईत सव्वा पाच लाखांची दारु पकडली…
