शिवसंग्रामच्या मुंबई अध्यक्षा अनुश्री माळगावकर यांचे आवाहन
*💫बांदा दि.०१-:* मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात राज्य सरकार बाजू मांडण्यात अयशस्वी झाल्याने कोर्टाने आरक्षण रद्द केले आहे. ‘ एक मराठा लाख मराठा’ च्या घोषणांनी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारा मराठा समाज आज हतबल झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याशी एकनिष्ठ असणार्या शिवसंग्रामचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी ५ जून रोजी बीड येथे आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चासाठी सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसंग्रामच्या मुंबई अध्यक्षा तथा डिंगणेच्या सुकन्या अनुश्री माळगावकर यांनी केले आहे.
