*💫वेंगुर्ले दि.०१-:* तालुक्यातील उभादांडा – मुठ येथील नुकसानग्रस्त मच्छिमार बांधवाना वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष राजन गिरप यांनी स्वखर्चाने व भाजपने ४५० मंगलोरी कौले, १५० कोने व २५ गॅलवनाईज पत्रे मदत दिली. तौक्ते चक्रिवादळाचा फटका वेंगुर्ले तालुक्यातील किनारपट्टीवर बसून नुकसान झाले. रेडी पासुन चिपी पर्यंतच्या किनारपट्टीला वादळाचा तडाखा बसुन मच्छिमार कुटंबाचे अतोनात नुकसान झाले. शासकीय नुकसान भरपाईची वाट न बघता भाजपा च्या वतीने पत्रे, ताडपत्री, पाण्याची टाकी, कौले इत्यादी अत्यावश्यक वस्तु नुकसानग्रस्तांना देण्यात येत आहेत.अशाचप्रकारचे नुकसान उभादांडा – मुठ या किनारपट्टी भागात झाले. वादळी वाऱ्यामुळे घरावरील कौले व नळे ऊडुन जाऊन नुकसान झाले. एकीकडे समुद्रातील उधाणामुळे मासेमारी बंद तर दुसरीकडे वादळामुळे नुकसान अशा द्विधा मनस्थितीत सापडलेल्या मच्छिमारांना नगराध्यक्ष राजन गिरप व भाजपाने मदतीचा हात दिला. मुठ – केपादेवी मंदिर येथे नुकसानग्रस्त मच्छिमारांना भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण व नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, नगरसेवक प्रशांत आपटे, उभादांडा शक्ती केंद्र प्रमुख निलेश मांजरेकर, बुथप्रमुख गंगाराम गीरप, दिनेश गिरप, क्रुष्णा केळुसकर, सहदेव गिरप इत्यादी उपस्थित होते. यावेळी भानुदास कांबळी, धनंजय गिरप, सिमा गिरप, गंगाराम गीरप, रमेश तांडेल, संतोष तोरसकर, आश्विनी गिरप, सुरेश चोडणकर, क्रुष्णा केळुसकर, वासुदेव गिरप, संजय गिरप इत्यादी मच्छिमार कुटुंबाना मदत देण्यात आली.
उभादांडा – मुठ येथील नुकसानग्रस्त मच्छिमारांना नगराध्यक्ष राजन गिरप व भाजपा कडून मदत…
