*💫सावंतवाडी-:* लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षपदी अँड. परिमल नाईक यांची तर सचिवपदी अमेय पई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर खजिनदारपदी प्रसाद परब आणि उपाध्यक्षपदी विद्याधर तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सावंतवाडी लायन्स क्लबची दिनांक काल ३१ मे रोजी माजी अध्यक्ष अशोक देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा संप्पन्न झाली. यावेळी संतोष चोडणकर, महेश पाटील, संदेश परब, बळवंत कुडतरकर, डॉ. गोविंद जाधव, दत्तु नार्वेकर, अँड. परिमल नाईक, विद्याधर तावडे, अमेय पई, प्रसाद परब आदी सदस्य उपस्थित. यावेळी नवनियुक्त कार्यकारणीचे सर्व सदस्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षपदी अँड परिमल नाईक यांची नियुक्ती
