सुरेश प्रभू यांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे मागणी
*💫मालवण दि.२९-:* कोरोनावरील उपचारासाठी डीआरडीओने विकसित केलेल्या 2डिजी या औषधाची सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याला जास्त गरज असून या औषधाचा पुरवठा तातडीने या जिल्ह्यांना करण्यात यावा अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र खास. सुरेश प्रभू यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पाठविले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात मोठे नुकसान केले आहे. कोरोनावरील उपचारासाठी डीआरडीओने विकसीत केलेल्या 2डिजी या औषधामुळे बऱ्याच रूग्णांचे प्राण वाचले आहेत. या औषधामुळे या संकट काळात दिलासा मिळत आहे. कोरोनामुळे महाराष्ट्राला जबरदस्त फटका बसला आहे. रूग्ण संख्या कमी होत असली तरी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात 2डिजी औषधाची जास्त गरज आहे, यासाठी या औषधाचा पुरवठा तातडीने करण्यात यावा असे खास. सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे.
