गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांच्याहस्ते शुभारंभ
*💫देवगड दि.२९-:* पुरळ गावामधील हुर्शी प्राथमिक शाळेमध्ये तर पडेल गावामधील श्रीराम माध्यमिक विदयामंदिर पडेल संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे उदघाटन देवगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले असून देवगड तालुक्यामधील पुरळ व पडेल गावामध्ये प्रथमच संस्थात्मक विलगीकरण कक्षाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी पुरळ गावामधील हुर्शी प्राथमिक शाळेमध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे उदघाटन करतेवेळी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब,विस्तार अधिकारी निलेश जगताप,ग्रामविकास अधिकारी नामदेव तांबे,पुरळ सरपंच अनुश्री तावडे,पुरळ उपसरपंच अनिल पुरळकर,तलाठी संतोष डांगे,पडेल हायस्कुलमधील संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे उदघाटन करतेवेळी पडेल सरपंच विकास दिक्षित,हिराचंद तानवडे,दोन्ही गावचे ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते. कोव्हीड विषाणूचा प्रादुर्भाव विचारात घेता देवगड तालुक्यामधील पुरळ व पडेल गावामध्ये प्रथमच संस्थात्मक विलगीकरण कक्ष् स्थापन करण्यात आला आहे. या दोनही कक्षामधील दहा दहा बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.गाव तेथे कोव्हीड सेंटर या जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार सदरच्या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे पुरळ व पडेल गावचे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण या संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात येणार आहेत.या दोन्ही गावच्या ग्रामविकास अधिकारी या पदाचा कारभार ग्रामविकास अधिकारी नामदेव तांबे यांच्याकडे असून त्यांनी तालुक्यामध्ये सर्व प्रथमच दोन्ही गावामध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्ष स्थापन केल्याने त्यांच सर्व स्तरावरुन अभिनंदन करण्यात येत आहे. फोटो- पुरळ येथे स्थापन करण्यात आलेला संस्थात्मक विलगीकरण कक्ष पडेल येथे स्थापन करण्यात आलेला संस्थात्मक विलगीकरण कक्ष
