वेत्ये गावातील खाण वाहतूक तात्काळ बंद करा

कोरोना प्रादुर्भाव झाल्यास ग्राम पंचायत जबाबदार;सामाजिक कार्यकर्ते संतोष गावडेंचा इशारा

*💫सावंतवाडी दि.२९-:* वेत्ये गावात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असतांनाही गावात सुरु असलेल्या सहस्त्रा इन्फ्रा प्रोजेक्ट एल एल पी या दगड खाणीवरील ट्रान्सपोर्ट वाहतुक आठ दिवस बंद ठेवावी अशी मागणी संबधीत कंपनीकडे करुनही त्याकडे कंपनी डोळेझाक करत असल्याचा आरोप करत यावर ग्रामपंचायतीने तातडीने ठोस पाऊल उचलत वाहतूक बंद करावी. अन्यथा गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याला ग्रामपंचायत जबाबदार राहील असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष गावडे यांनी दिला आहे. श्री गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हंटले आहे की, वेत्ये गावात सहस्त्रा इन्फ्रा प्रोजेक्ट एल एल पी या दगड खाणीवरील ट्रान्सपोर्ट वाहतुक ही दररोज गोवा राज्यात होत असते. या टान्सपोर्ट वरील डंपरवरील गावातील चालक यापुर्वी कोरोना पाॅझिटीव्ह आले होते. आजही पाॅझीटीव्ह रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधून सदर दगड खाणी वरील वाहतूक आठ दिवसासाठी बंद ठेवण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचेही लक्ष वेधण्यात आले होते. मात्र अद्याप पर्यंत सदरची वाहतूक बंद नसून दिवसाला शंभर डंपर गोवा राज्यातून ये – जा करत आहेत. त्यामुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या वाहतुकीला ग्रामपंचायत प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोपही श्री गावडे यांनी केला आहे.

You cannot copy content of this page