मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
*💫कणकवली दि.२९-:* सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये नुकसानग्रस्त झालेले अनेक घर मालक हे मुंबई येथे कामानिमित्त राहत असून, कोरोना काळात ई पास मिळत नसल्याने ते येथे येऊन प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यावर सही करणे शक्य नाही आहे. त्यामुळे ते या मदतीपासून वंचित राहण्याची वेळ येईल असे वाटत आहे. यावर प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन उपाययोजना करावी. अशी मागणी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
