आमदारांना कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या दत्ता सामंत यांचे चुकले क़ाय

सेनेत नसलेले अस्तित्व निर्माण करण्यासाठी धूमकेतू मंदार केणी यांचा प्रयत्न;जी प सभापती महेंद्र चव्हाण यांचा पलटवार

मालवण दि प्रतिनिधी भाजपचे नेते दत्ता सामंत हे राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करीत असल्याने ते जनतेला आपलेसे वाटत असल्याने दत्ता सामंतही त्याच भावनेतून महामारीत मदत कार्य करीत आहेत. परंतु फोटो सेशन साठी करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांना सामंत यांनी जबाबदारीची जाणीव करून दिली तर त्यात वावगे काही नाही. याचा बाऊ नगरसेवक मंदार केणी यांनी करू नये. धूमकेतू प्रमाणे उगवणाऱ्या केणी यांची सामंत यांच्यावर टीका करून शिवसेनेत स्वतःचे नसलेले अस्तित्व निर्माण करण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड आहे अशी टीका सिंधुदुर्ग जि . प. चे बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री चव्हाण यांनी म्हटले आहे की,केणी यांना शिवसेनेत कोणीच विचारत नसल्याने ते सामंत यांच्यावर टीका करून सूर्यावर थुंकण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत केणी असे प्रकार करून आमदार नाईक यांचे समर्थक होऊ पाहत आहे जेणे करून पदरात काहीतरी पडेल अशी त्यांची अपेक्षा असेल. शिवसेनेत स्वतःची नसलेली पत आणि जम बसविण्यासाठी आदळआपट करीत आहेत. सामंत हे राणे परिवाराचे जवळचे आहेत. राणे साहेबांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांना कुठल्याही पदाची अपेक्षा नाही हे त्यांनी अनेकवेळा जाहीर बोलून दाखविले आहे. सामंत पदाच्या अपेक्षेने काम करीत नाहीत. जनसेवा हा त्यांचा स्वभाव आहे त्याच भावनेतून अविरत काम करीत आहेत. पुढील विधानसभा निवडणूक आमदार नाईक यांना सोपी नाही हे सर्वश्रुत आहे. यांची जाणीव नाईक आणि शिवसेनेला आहे. म्हणूनच सामंत यांची धास्ती शिवसेना आणि नाईक यांनी घेतल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे

You cannot copy content of this page