शिवा जाधव यांचे निधन

अष्टपैलु कलाकार हरपल्याची उमटत आहे मालवणमध्ये

मालवण, दि प्रतिनिधी मालवण शहरातील आडवण- देऊळवाडा येथील रहिवासी, उत्कृष्ट कलाकार नरेंद्र ऊर्फ शिवा राघो जाधव (वय ४६) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. शिवा जाधव हे अष्टपैलू कलानिकेतन या संस्थेचे सदस्य, सिंधुदुर्ग दिव्यांग शहर संघटनेचे सचिव, राष्ट्रीय अपंग विकास महाराष्ट्र, सिंधुदुर्ग शाखेचे खजिनदार, मातृत्व आधार फाउंडेशन मालवण या संस्थेचे सदस्य म्हणून कार्यरत होते. मालवणच्या सांस्कृतिक चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते. अनेक मराठी विनोदी नाटकांमधून त्यांनी रसिकांचे मनोरंजन केले होते. उत्कृष्ट चकिवादक म्हणून ते ओळखले जात. हरहुन्नरी, स्पष्टवक्ता म्हणूनही ते ओळखले जात. त्यांच्या अकाली निधनाने मित्रपरिवारात, शहर परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे बहिणी, भावोजी, भाचे असा परिवार आहे.

You cannot copy content of this page