२० ऑक्सिजन युक्त बेडची असणार सोय*
*💫मालवण दि.२९-:* कोविडच्या रुग्णांची वाढती संख्या आणि कोविड सेंटरमधील अपुरी पडणारी बेडची व्यवस्था लक्षात घेता आमदार वैभव नाईक यांनी ग्रामीण रुग्णालयानजीकच्या नगरपालिकेच्या इमारतीत ऑक्सिजन युक्त २० बेडचे कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आवश्यक बेड व ऑक्सिजन उपलब्ध झाला असून कोविड सेंटर उभे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोविडच्या रुग्णांवर उपचार व्हावेत यासाठी आमदार नाईक यांच्या संकल्पनेतून कुंभारमाठ शासकीय तंत्रनिकेतन येथे ७५ बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. याठिकाणी कोरोनाचा रुग्णांवर उपचार केले जात आहे. मात्र यानंतरही शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कोविड सेंटरमधील बेडची संख्या अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे आमदार नाईक यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या लगत असलेल्या पालिकेच्या इमारतीत २० बेडचे ऑक्सिजन युक्त कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आवश्यक बेड व ऑक्सिजन सिलिंडर आज दाखल झाले असून कोविड सेंटर सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे कोविड सेंटर सुरू झाल्यास अपुरी बेडची भासणारी समस्या दूर होण्यास मदत मिळणार आहे.
