प्रशासनाच्या आवाहनाला साथ देत वायंगणी ग्रामपंचायतचा पुढाकार
*💫मालवण दि.२९-:* कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने गावपातळीवर विलगीकरण कक्ष उभारण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत वायंगणी ग्रामपंचायत तर्फे वायंगणी हायस्कूल येथे दहा बेडचे विलगीकरण कक्ष उभारण्यात आला. याचे उद्घाटन ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी चे संस्थाध्यक्ष सदानंद राणे यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले. या वेळी त्यांच्या सोबत ग्रामसेवक आर आर फणसेकर, केंद्र प्रमुख सुगंधी गुरव, मुख्याध्यापक डि जे टकले, ग्रामपंचायत सदस्य सुनील माळकर,पोलीस पाटील सुनील त्रिंबककर,रुतुजा राणे, सरीता घाडीगांवकर, दिनेश साळकर,किशोर वायंगणकर, संतोष वायंगणकर, वैभव जोशी,अमेय सावंत आदी उपस्थित होते. ग्रामिण भागात वाढणारया कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने रुग्णांना ग्रूह विलगीकरण कक्षात न ठेवता ग्रामस्तरावर विलगीकरण कक्ष स्थापन करुन त्यात सौम्य लक्षणे दिसणारे रुग्ण ठेवण्याचे आवाहन केले होते.याला प्रतिसाद देत वायंगणी येथे विलगीकरण कक्ष सुरु केला आहे.
