*राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिले १५ सौर ऊर्जेवरील दिवे*
मालवण (प्रतिनिधी) तौक्ते वादळातील नुकसानग्रस्त कोकणी जनतेसाठी आमदार योगेश सागर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई चारकोप विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या नगरसेवक, दानशूर व्यक्ती, पदाधिकारी यांच्या वतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला असून आवश्यक साहित्य नुकसानग्रस्तांसाठी पाठविण्यात आले आहे. यामध्ये पत्रे, ताडपत्री, ब्लँकेट, अन्नधान्य, कपडे, आदी सामानाचे दोन ट्रक कांदिवली येथून कोकणात रवाना झाले. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, आमदार भाई गिरकर, जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, रघुनाथ कुलकर्णी, सुहास आडिवरेकर, सुमेश आंब्रे, बाळा तावडे, कमलेश यादव, माजी नगरसेवक श्रीकांत कवठणकर, चारकोप विधानसभा मतदार संघ महामंत्री योगेश पडवळ, व इतर नगरसेवक उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार गोपाळ शेट्टी यांनी कोकणच्या जनतेने या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने भरघोस मदत करावी असे आवाहन केले. तर आमदार योगेश सागर म्हणाले, कोकणची जनता स्वाभिमानी आहे, तौक्ते वादळाचा फटका बसुनही जनतेने आपले संसार उभे केले आहेत, आम्ही कार्यकर्ते व नगरसेवक यांच्या माध्यमातून मदतीचा छोटासा प्रयत्न केला आहे, स्थानिक कार्यकर्त्यांनी गरजु लोकांना पर्यंत ही मदत पोहचवावी, असेही ते म्हणाले. ही मदत जमा करण्यात साठी माजी नगरसेवक श्रीकांत कवठणकर, चारकोप विधानसभा मतदार संघ महामंत्री योगेश पडवळ, शेखर तर्फे, प्रमोद गुजर, सुनिल कदम, संतोष जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.
