वनविभागासमोर वाहतूक ठप्प; टोईंग व्हॅनच्या सहाय्याने गाडी बाहेर, नागरिकांकडून नगरपरिषदेच्या नियोजनावर सवाल..
⚡सावंतवाडी ता.०९-: शहरातील वनविभाग समोर तुंबलेल्या पाण्यात गटाराचा अंदाज न आल्याने चारचाकी गाडी त्यात अडकली. अखेर टोईंग व्हॅनच्या सहाय्याने ती गाडी बाहेर काढण्यात आली. १५ दिवसांपूर्वी मोरीच काम इथे करण्यात आलं. यावेळी अधिकारी, ठेकेदाराकडून आवश्यक दक्षता न घेतल्याने हे पाणी रस्त्यावर तुंबले होते.
मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. यात चारचाकी गाडीच चाक गटरात अडकून बसल होत. गाडी बाहेर निघत नसल्याने अखेर टोईंग व्हॅन बोलवावी लागली. यावेळी व्हॅनच्या सहाय्याने ती गाडी बाहेर काढण्यात आली. जवळपास एक तास यात गेला. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तसेच एसटी बस अडकून पडल्या होत्या. यामुळे नागरिकांसह प्रवाशांना देखील नाहक मनस्ताप सहन करावा लागला. या मदत कार्यात पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी देखील पुढाकर घेतला होता.
दरम्यान, याबाबत न.प. बांधकामचे अभियंतांना विचारले असता, आचारसंहिता लागल्याने वर्क ऑर्डर मिळायला उशीर झाला. त्यामुळे काम सुरू होण्यास उशीर झाल्याचे त्यांनी सांगितले. मोरीच काम हे पावसाळ्यापूर्वी होण अपेक्षित होत. मात्र, आचारसंहितेच कारण देत भर पावसात नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात काम केली जात आहेत. याचा नाहक मनस्ताप शहरवासीयांना सहन करावा लागत असून प्रशासकीय राजवटच बरी होती अशा भावना नागरीक बोलून दाखवत आहेत. मोरीच काम करताना शेजारील गटाराच पाणी जाणार कुठे ? याची दक्षता संबंधित विभागाने घेणं आवश्यक होतं. मात्र, उघड्या गटाराच्या शेजारी बॅरीकेट लावण्याचीही तसदी त्यांनी घेतली नाही. आजची घटना घडल्यानंतर तसेच चार लोक गटारात अडकल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. तर भर पावसात ही काम कशासाठी ? असाही सवाल नागरिकांतून विचारला जात आहे
