⚡वेंगुर्ला ता.०९-: वेंगुर्ला तालुक्यातील वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी या मुख्य मार्गानजिक मठ मठकरवाडी येथे मुख्य रस्त्यावर गटारांची व्यवस्था नसल्याने
पाणी साचून राहत असल्याने येथील नागरिकांना पावसाळ्यात आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. याबाबत संबंधित विभागाने तातडीने लक्ष पुरवावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. मठ मठकरवाडी येथील अनिल मठकर, मंदार मठकर संतोष तळवडेकर, बाळकृष्ण मठकर, राजाराम बोवलेकर, किशोर बोवलेकर, अशोक मठकर, सागर मठकर अंकिता मठकर, मिलन मठकर, अंजली मठकर आदी ग्रामस्थांनी याबाबत संबंधित विभागाने याकडे लक्ष पुरवून येथील ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याच मार्गांनजिक अंडरग्राउंड वीज वाहिन्यांचे काम करण्यात आले आहे. परंतु येथील पाईपलाईन अर्धवट कामामुळे या वाडीतील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गटारांची सोयच नसल्याने पाणी घरानजिक साचून राहत असल्याने स्थानिकांना घरी दुचाकी नेण्यासाठी समस्या तसेच दरवर्षी पावसाळ्यात आरोग्य समस्या उद्भवतात.
याबाबत गटार सुरळीत करून किमान पाईपची व्यवस्था केल्यास नागरिकांचा प्रश्न सुटू शकतो, याबाबत संबंधित विभागाने तातडीने laksh पुरवावे अशी मागणी मठ मठकरवाडी येथील स्थानिक ग्रामस्थांतून करण्यात आली आहे.
वेंगुर्ला मठ मठकरवाडी येथे रस्त्यावरील दूषित पाण्यामुळे आरोग्य समस्या…
