पाल श्री भूमिका देवीचा ” मळलेपन सोहळा ” मंगळवार 9 जून रोजी…

⚡वेंगुर्ला ता.०९-: वेंगुर्ला तालुक्यातील पाल येथील प्रसिद्ध श्री भूमिका देवीचा “मळलेपन सोहळा” मंगळवार दि. 9 जून रोजी सकाळी ८ वाजता
श्री भूमिका देवी मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. मळलेपन कार्यक्रमानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या मळलेपन कार्यक्रमानिमित्त श्री भूमिका देवी मंदिरात मंगळवार दिनांक १६ जून २०२६ रोजी ८ वाजता “पवमान” विधी आणि महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी पाल ग्रामस्थ, पाल गावाच्या माहेरवाशीणी आणि पाहुणे देवी भक्त भाविक यांनी मळलेपन आणि ‘पवमान विधी’ सह महाप्रसाद कार्यक्रमास तसेच दर्शनास उपस्थित राहून सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन
देवस्थान स्थानिक सल्लागार
उपसमिती, पाल तसेच
पाल गावाचे मानकरी व ग्रामस्थ आणि पाल ग्रामोन्नती मंडळ, मुंबई यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page