वेंगुर्ला पेंडूर ग्रामपंचायत मार्फत “संडे ऑन सायकल” उपक्रम…

⚡वेंगुर्ला ता.०७-: वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामपंचायत पेंडूर मार्फत जागतिक पर्यावरण दिन अंतर्गत रविवारी 7 जून रोजी “संडे ऑन सायकल” हा उपक्रम पेंडूर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात राबविण्यात आला. यावेळी सरपंच संतोष गावडे यांच्या हस्ते ‘संडे ऑन सायकल’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच संतोष गावडे, उपसरपंच मिलिंद गावडे, ग्रामपंचायत अधिकारी सोमा राऊळ, ग्रामपंचायत सदस्य प्रणिता सावंत, समीक्षा तांडेल, कर्मचारी वैशाली नाईक, घनश्याम नाईक,
सत्यवान तांडेल, महेश तांडेल, अंगणवाडी सेविका शाळा शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष उमेश सावंत, मदन कवठणकर, अंकुश शिरोडकर, प्रसाद सावंत, बाबत मेस्त्री, लक्ष्मण मांजरेकर, प्रभाकर नाईक, महेश गावडे, समीर तेंडुलकर, अंगणवाडी कर्मचारी आदी ग्रामस्थ महिला सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page