परुळे येथे डम्पर व कार अपघातात दैव बलवत्तर दोघे बचावले…

वेंगुर्ला उपसभापती सचिन देसाई यांचा आक्रमक पवित्रा..

⚡वेंगुर्ला ता ०७-: वेंगुर्ला तालुक्यातील
परुळे आदिनारायण मंदिर समोर भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरची पार्किंग केलेल्या दोन कारला धडक बसली. धडकेनंतर डंपर माड पोफळी बागायती मध्ये जाऊन कलंडला, सुदैवाने मोठा अनर्थ टळला. केवळ दैव बलवत्तर म्हणून दोघे बचावले. दोन्ही कारमधील व्यक्ती श्री देव आदिनारायणाच्या दर्शनासाठी मंदिरात गेली असताना ही घटना घडली आरोसकर, सामंत कुटुंबावर काळ आला होता, मात्र सुदैवाने देवदर्शनाला गेल्याने ते बालबाल बचावले. कारला डंपर ने टक्कर दिल्यानंतर हॅन्ड ब्रेक करून पार्क केलेली कार सुमारे 70 फूट हून अधिक फरफटत रस्त्यावरून गेली. कार पूर्णपणे डॅमेज झाली असून डंपर चालक दारू पिऊन डंपर चालवत असल्याची चर्चा होती. दरम्यान घटनास्थळावरून डम्पर ड्रायव्हरने पळ काढत पोलीस स्टेशन गाठले. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. केळूस येथील डॉ. मंदार आरोसकर व वेंगुर्ला येथील ओंकार सामंत (एमएच 07 एजि 7893 व एमएच 07 एजि 3641) या दोन्ही कारने आपल्या कुटुंबासह परुळे येथील श्री देव आदिनारायणाच्या दर्शनासाठी आले होते. त्यांनी रस्त्याच्या बाजूला दोन्ही गाड्या पार्क करून ठेवल्या होत्या. कुडाळहून येणारा डंपर ( क्र. एमएच 07 एएच 5099) आदिनारायण मंदिराच्या उताराला सुसाट वेगाने आल्याने त्याचा डंपर वरील ताबा सुटला आणि थेट पार्क करून ठेवलेल्या दोन्ही कारला ठोकर देऊन येथील जुन्या बस स्टॉप ला जाऊन धडकला आणि बागायती मध्ये कलंडला. सुदैवाने त्या वेळेला गाडीत कोणी नव्हते व मुख्य रस्त्यावरही कुणी नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पिंगुळी परुळे या रस्त्यावर नेहमी डम्पर चालक वेगाने डम्पर चालवत असतात आणि या मार्गाने मोठ्या प्रमाणात मालवण तालुक्यातील देवलीहून वाळू वाहतूक केली जाते. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. भरधाव वेगाने चालविणाऱ्या डम्पर चालक योग्यती कारवाही होणे गरजेचे आहे, पण त्यांच्यावर प्रशासन का कारवाही करत नाही हे मात्र समजू शकत नाही का, एखादी जीवित हानी होण्याची प्रशासन वाट बघत आहे, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी पोलिसांकडे उपस्थित केला. एएसआय एस. पी. कांबळे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व अपघातग्रस्त कार रस्त्यावर हटवण्याचे ठरविले. मात्र त्यावेळी वेंगुर्ला पंचायत समिती उपसभापती तथा वेंगुर्ला शिंदे शिवसेना तालुकाप्रमुख सचिन देसाई यांनी ठोस भूमिका घेत जोवर ड्रायव्हरची अल्कोहोल टेस्ट होत नाही तोपर्यंत अपघात ग्रस्त वाहने हटवू नयेत, अशी भूमिका घेतली. पोलिसांकडून ड्रायव्हरच्या अल्कोहोल चाचणीस उशीर होत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून निघून गेले. संबंधित डम्पर ड्रायव्हरला कुडाळ येथे अल्कोहोल टेस्टिंग साठी नेण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत निवती पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. या घटनेबाबत निवती पीएसआय भीमसेन गायकवाड हे अधिक तपास करीत आहेत.

You cannot copy content of this page