प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांचा त्रास दूर; लोकोपयोगी कार्याबद्दल सर्व स्तरांतून कौतुक..
⚡सावंतवाडी ता.०७-: प्रभाग क्रमांक २ मधील खराब झालेल्या रस्त्यांमुळे नागरिक, वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन नगरसेवक श्री. बाबू कुडतरकर यांनी प्रशासकीय मंजुरी किंवा निधीची वाट न पाहता स्वखर्चातून रस्त्याचे काँक्रिटीकरण व दुरुस्तीचे काम हाती घेत पूर्ण केले आहे.
रस्त्यावरील खड्डे आणि खराब झालेल्या भागामुळे परिसरातील नागरिकांना रोजच्या प्रवासात अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर लोकहिताचा विचार करून श्री. कुडतरकर यांनी तातडीने पुढाकार घेत रस्त्याची दुरुस्ती केली. त्यांच्या या कार्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या नगरसेवक बाबू कुडतरकर यांच्या या लोकहितैषी कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. तसेच प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
