⚡मालवण ता.०५-:
मुंबई येथील ‘परब को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुंबई ‘ या संस्थेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता १० वी, १२ वी, पदविका (Diploma), पदवी (Degree) व उच्च शिक्षण परीक्षेत यशस्वी झालेल्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांना ‘पारितोषिक योजना’ अंतर्गत किमान ७५ टक्के वरील गुण मिळवणाऱ्या सभासदांच्या पाल्यांचा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पारितोषिक देवून गौरव करण्यात येणार आहे तर संस्थेच्या सभासदांव्यतिरिक्त कोकण विभागातून म्हणजेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर यामधील ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही विशिष्ट विषयामध्ये पैकीच्या पैकी (१००%) गुण मिळाले असतील, अशाही गुणवंत पाल्यांचा संस्थेच्या अध्यक्षांच्या वतीने विशेष पारितोषिक देऊन सन्मान केला जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीकृष्ण उर्फ दीपक द. परब यांनी दिली आहे
संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीकृष्ण उर्फ दीपक द. परब यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, इयत्ता १० वी पासून उच्च शिक्षण परीक्षेत किमान ७५% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवून पहिल्या तीन क्रमांकांमध्ये येणाऱ्या सभासदांच्या पाल्यांचा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर सत्कार करण्यात येईल.संस्थेच्या सर्व सभासदांनी आपल्या उत्तीर्ण पाल्यांची गुणपत्रिका १५ ऑगस्ट २०२६ अखेरपर्यंत संस्थेच्या भांडुप येथील मुख्य कार्यालयात आणून जमा करावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
▪️विशेष पारितोषिक योजना
यावर्षी संस्थेने एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेच्या सभासदांव्यतिरिक्त कोकण विभागातून ( सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर ) ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही विशिष्ट विषयामध्ये पैकीच्या पैकी (१००%) गुण मिळाले असतील, अशाही गुणवंत पाल्यांना संस्थेच्या अध्यक्षांच्या वतीने विशेष पारितोषिक देऊन सन्मानित केले जाणार आहे.
तरी सर्व संबंधित पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत गुणपत्रिका कार्यालयात जमा करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन परब को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुंबई अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक द. परब यानी केले आहे.
