रीलस्टार अंकिता प्रभूवालावलकर यांच्याकडून रविना रेवंडकर यांच्या उपचारांसाठी आर्थिक मदत…

⚡मालवण ता.०५-:
मालवण शहरातील दांडी मोरेश्वर वाडी येथील सौ. रविना रवींद्र रेवंडकर या पोटातील ट्यूमरच्या आजाराने ग्रस्त असून असून त्यांच्यावर कणकवली येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर रीलस्टार अंकिता प्रभूवालावलकर यांच्यावतीने त्यांना १० हजारांची रुपये मदत सौ. रेवंडकर यांचे पती रविंद्र रेवंडकर यांच्याकडे धनादेश स्वरूपात देण्यात आली आहे.

श्री. रेवंडकर हे मोलमजुरीचा व्यवसाय करतात. त्यांची पत्नी रविना रविंद्र रेवंडकर (वय ४५ वर्ष) यांच्या पोटामध्ये २४x२५ mm चा ट्यूमर आहे आणि फुफुसामध्ये पाणी झाले आहे. त्यांना उपचारासाठी कणकवली येथील डॉ. बिरमोळे यांच्याकडे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या ऑपरेशनला येणारा खर्च खूप जास्त असून त्यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page