जिल्ह्यातील पहिली ग्राम पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पराडकर यांच्याहस्ते शुभारंभ
मालवण दि प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने गाव पातळीवर ग्राम विलगिकरण कक्ष उभारण्याचे आवाहन केल्यानंतर या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील पहिल्या ग्राम विलगिकरण कक्षाची उभारणी मालवण तालुक्यातील आडवली- मालडी येथे करण्यात आली असून या कक्षाचे उदघाटन जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते करण्यात आले. आडवली- मालडी गावचे सुपुत्र व जि. प. सिंधुदुर्गचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा ग्राम विलगिकरण कक्ष सुभाष विद्यालय येथे उभारण्यात आला आहे. आडवली- मालडी ग्रामपंचायतचा आदर्श घेत जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतनी ग्राम विलगिकरण कक्ष उभारावेत असे आवाहन सीईओ प्रजित नायर यांनी केले आहे. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर,जि. प. वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती सतीश परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सरपंच संदीप आडवलकर,उपसरपंच सौ सोनाली पराडकर, मालवण प.स. प्रकल्प संचालक सौ कौमुदिनी पराडकर, सामाजिक कार्यकर्ते अरुण लाड, अरविंद साटम, डॉ. साळकर, कृषी अधिकारी श्री गोसावी, विस्तार अधिकारी पी. डी. जाधव, श्री बांगर, ग्रामसेवक कृष्णाजी दळवी तसेच आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. सौम्य लक्षणे असलेले रुग्ण गृह विलगीकरण न करता या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. १० बेडचा विलगी करण कक्ष असून यासाठी डॉ प्रकाश साटम, सहदेव साटम, सामाजिक कार्यकर्ते अरुण लाड, अरविंद साटम व ग्रामपंचायत आडवली- मालडी यांनी बेड उपलब्ध करुन दिले आहेत.
