⚡वेंगुर्ला ता.२९-: वेंगुर्ला शहरात नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप व टीमने मागील टर्मला वेंगुर्ला शहरात मध्यवर्ती भागात अद्ययावत मच्छिमार्केट व सुसज्ज अशी पार्किंग व्यवस्था केली आहे. दरम्यान आज शुक्रवारी येथील स्वच्छतागृह नजिक चक्क मधोमध रिक्षा पार्किंग करण्यात आल्याने दुचाकी वाहनधारकांना व नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली. यामुळे नगरपरिषदने नेमलेल्या कर्मचारी व अन्य वाहनधारक यांच्यात पुन्हा एकदा भर मच्छीमार्केट समोर बाचाबाची झाली. त्यामुळे नागरिकांच्या होणाऱ्या मोठ्या गैरसोयीकडे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी लक्ष पुरवावे, अशी मागणी वाहधारकातून करण्यात आली आहे. शहरात मुख्य बाजारपेठेत होणाऱ्या ट्राफिक जाम कडे कोणाचेच लक्ष नसल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. याच स्वच्छतागृहातील व बाहेरील विद्युत उपकरणे तुटून धोकादायक स्थिती आहे.
वेंगुर्ला मच्छीमार्केट नजिक पार्किंग एरियात चक्क मधोमध रिक्षा पार्किंग….
