प्रसन्ना देसाई यांना ‘बेस्ट सपोर्ट फॉर डिसेबल’ “राज्यस्तरीय पुरस्कार”प्रदान…

सलग दुसऱ्या पुरस्काराने श्री. देसाई यांचा सन्मान..

⚡वेंगुर्ला ता.२७-: कोल्हापूर -गडहिंग्लज येथील ‘ऑनररी कॅप्टन आबा पाटील दिव्यांग सोशल फाउंडेशन कडगाव’ संस्थेच्या वतीने दिला जाणारा वर्ष २०२५-२६ चा अत्यंत प्रतिष्ठेचा “बेस्ट सपोर्ट फॉर डिसेबल” (Best Support for Disabled) हा राज्यस्तरीय पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांना आज अत्यंत उत्साहात प्रदान करण्यात आला.
वेंगुर्ला
येथील भाजपा कार्यालयात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी ऑनररी कॅप्टन आबा पाटील दिव्यांग सोशल फाउंडेशन कडगाव या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष शारदा पाटील, संस्थापक बाळासाहेब आबाजी पाटील, साहस प्रतिष्ठान अध्यक्ष रूपाली पाटील, सचिव अक्षता पाटील, सदानंद पाटील, उपाध्यक्ष संदीप पाटील तसेच देवदत्त पाटील, लता पाटील आदी उपस्थित होते.दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी आणि सामाजिक उन्नतीसाठी प्रसन्ना देसाई यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यांच्या याच सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक सामाजिक सेवेची दखल घेऊन ‘ऑनररी कॅप्टन आबा पाटील दिव्यांग सोशल फाउंडेशन’च्या वतीने यावर्षीचा हा सर्वोच्च राज्यस्तरीय सन्मान त्यांना देण्यात आला.
​या दिमाखदार सोहळ्याला सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रसन्ना देसाई यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
​पुरस्काराला उत्तर देताना प्रसन्ना देसाई यांनी संस्थेचे आभार मानले आणि “हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून दिव्यांग बांधवांसाठी काम करणाऱ्या प्रत्येक घटकाचा आहे. या सन्मानामुळे सामाजिक कार्याची जबाबदारी आणखी वाढली असून, यापुढेही दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर राहीन,” अशी भावना व्यक्त केली.
​या सोहळ्या निमित्त उपस्थित मान्यवरांनी प्रसन्ना देसाई यांच्या कार्याचे कौतुक केले.

You cannot copy content of this page