ग्रामीण-शहरी विकासकामे लवकर मार्गी लावण्याचे निर्देश; पुढे दरवर्षी आमसभा घेऊन कामांचा आढावा घेणार;आमदार निलेश राणे.
⚡मालवण ता.२८-:
मालवण तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न आजच्या आमसभेत मांडले गेले आहेत या आमसभेत झालेले विषय हे सभेपूरते मर्यादित न राहता त्यावर तोडगा काढून त्या प्रश्नाचे निवारण झाले पाहिजे यासाठी अधिकारी वर्गाने कामाचा टाईम बॉण्ड निकाल लावावा असा सज्जड दम भरतानाच आम निलेश राणे यांनी आजची आमसभा ही नऊ वर्षांनी झाली असली तरी यापुढे प्रत्येक वर्षी आमसभा होणार असल्याने पुढील वर्षी आजच्या आमसभेत झालेल्या इतिवृत्ताची चर्चा आमसभेपूर्वी चर्चा करण्यात येणार आहे कोणतेही कारण न सांगता अधिकारी वर्गाने प्रश्नांचे निवारण करावे असे आवाहनही त्यांनी केले
मालवण येथील नगर पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा झाली. यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा साईल, सभापती प्रज्ञा चव्हाण, वित्त, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, उपसभापती घनश्याम झाड, तहसीलदार गणेश लव्हे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, जिल्हा परिषद सदस्य दिपलक्ष्मी पडते, सुमेधा पाताडे, अक्षता गावडे, वर्षा सांबारी, यांच्यासह अन्य जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून आमदार निलेश राणे हे बोलत होते
यावेळी बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, ग्रामीण आणि शहरी भागातील जी विकास कामे असतील ती रोज अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून ही आजची आमसभा आहे या आमसभेत मांडले गेलेले विकास विषयक प्रश्न काही दिवसात मार्गी लावण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जातील असे सांगुन आमदार राणे म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिकारी वर्ग यावा यासाठी आणि आलेल्या अधिकारी वर्गाने बदली मागू नये यासाठी चांगल्या पद्धतीचे वातावरण निर्माण करण्याचे काम केले जात आहे या जिल्ह्यात अधिकाऱ्यांची कमतरता आहे हे मान्य आहे मात्र गेल्या काही वर्षात खास करून या मतदार संघात कामच झाली नाही आता नितेश राणे हे पालकमंत्री आहेत ते चांगल्या पद्धतीने काम करत आहेत त्यामुळे यापुढे अधिकारी वर्गांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेतली जाईल अधिकारी वर्गाला जी काम सांगितली आहेत ती टाईम बॉण्ड लावून ती काम करावीत असा सज्जड दमही त्यांनी दिला
ते पुढे म्हणाले, मी आमदार आहे , खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे हे आमचेच असल्यामुळे विकास कामे अडून राहणार नाहीत आमचे जेवढे उत्तरदायित्व आहे तेवढेच तुमचेही उत्तरदायित्व आहे विकास कामे करताना आपल्या हातून कुठल्याही वाईट कृत्य होता कामा नाही याची दक्षता घेतली पाहिजे असे सांगून ते म्हणाले, 2014 नंतर मालवण कुडाळ हा मतदार संघ दहा वर्षे आजारी अवस्थेत होता मंत्रालयाने तर या मतदारसंघावर फुली मारली होती 2014 पर्यंत या मतदारसंघाचे नेतृत्व नारायण राणे हे करत असताना विकास कामे होत होती मात्र त्यानंतर दहा वर्ष या मतदारसंघाचे कोणतेही आराखडे झाले नाहीत, निधीची तरतूद झाली नव्हती अशी परिस्थिती असताना हा मतदार संघ माझ्या हातात आला आणि गेल्या वर्षभरात आपण या मतदारसंघावर जे काम केलं त्या कामामुळे निधी येत आहे अधिकारी वर्गाने तो खर्ची घालावा जो आमचा हक्काचा निधी आहे तो निधी खेचून आणणारच त्यामुळे अपेक्षित असलेली कामे पूर्ण करावी तळागाळात जाऊन आम्ही काम करत असल्याने लोकांच्या प्रश्नांना उत्तरे ही आमदार म्हणून मला द्यावी लागतात त्यामुळे विकास कामांबाबत तुम्हालाही उत्तर द्यावी लागतील म्हणून अधिकारी वर्गाने कामाला लागावे असे सांगितले
