१५ मे पूर्वी सावंतवाडीतील सर्व रस्ते पूर्ण करणार…

नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची ग्वाही: पाण्याच्या प्रश्नावर कोणी राजकारण करू नये ;विरोधकांना केले आवाहन..

⚡सावंतवाडी ता.२४-:
शहरातील सर्व रस्त्यांची कामे १५ मेपूर्वी पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही घेतली असून ती पूर्ण करून दाखवणार आहोत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी सावंतवाडी शहर ‘चकचकीत’ केले जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांनी आज येथे दिली. त्या आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

नगराध्यक्षा म्हणाल्या, न.प. च्या सर्वसाधारण सभेत विविध संस्थांना अनुदान देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच उपलब्ध शववाहिका शहरवासीयांसाठी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य व रूग्णालयावर आमचा अधिक लक्ष आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्यांबाबत आम्ही सकारात्मक आहोत. शवविच्छेदन विभागाच्या दुरूस्तीसह हायमास्ट येथे बसविण्यात येणार आहे. याबाबत आमची बैठक उपजिल्हा रुग्णालय व सार्वजनिक बांधकाम विभागाशी झाली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांचेही लक्ष आम्ही वेधणार असून मच्छी मार्केटमधील समस्या दूर होणार आहेत. महिलांसाठी तिथे आवश्यक सुविधा होणार आहे. तसेच सालईवाडा, सर्वोदयनगर ते मच्छी मार्केट कडील काम पूर्ण झाले असून इतर भागात चालू आहे. पूर्ण झालेल्या ठिकाणी १५ मे पूर्वी रस्ते सुस्थितीत आणले जाणार आहेत. पावसाळ्यापूर्वी महावितरण सोबत बैठक घेऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

पाण्यावर राजकारण नको !


दरम्यान, पाणी समस्या मोठी असून यावर राजकारण होऊ नये. सगळ्या लोकांना पाणी पुरवठा करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. नागरिकांनी त्रास होणार नाही यासाठी प्रयत्न करू, पाण्याची लाईन जुनी असल्याने त्रास होत आहे. विरोधकांनी देखील एकत्र येत या समस्यांवर मात करण्यासाठी सहकार्य कराव, आमच धेय्य हे विकास करणे हेच आहे असे मत व्यक्त केले. नवीन लोकांना काम करायला संधी देणं काळाची गरज आहे. त्यांचे निर्णय हे ठाम असून भारताच्या प्रगतीसाठी युवकांना संधी मिळणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण देखील तेवढच आवश्यक आहे. माझा हेतू हा विकास करणं आहे. मात्र, काहीही चुकीचं होतं असेल त्यावर निश्चितच योग्य निर्णय घेण्यात येतील.सावंतवाडीच्या विकासाचा हेतू घेऊन आम्ही कार्यरत आहोत. जिल्हाधिकारी यांनी दिलेली भेट ही प्रशासकीय कामाचा आढावा घेण्यासाठी होती. मैदानात उतरून काम करण्यावर त्यांचा भर असून त्या जिल्ह्यातील सर्वच न.प. ना भेट देणार आहेत. वादळाने झालेल्या नुकसानीची पाहाणी आम्ही केली असून आमची टीम नुकसानग्रस्त २२ ठिकाणी कार्यरत आहे. दीपक केसरकर यांनी देखील पाहाणी केली असून लवकरात लवकर परिस्थिती पूर्ववत होणार आहे‌ असंही त्यांनी स्पष्ट केले.

नळपाणी कामाचा दर्जात तडजोड होणार नाही : प्रतिक बांदेकर


यावेळी संस्थानकालीन भिडाची पाईपलाईन आता उपलब्ध नसल्याने त्या फुटलेल्या भागाच्या ठिकाणी पीव्हीसी पाईप वापरला गेला आहे‌. नवीन येणारी पाईप लाईन आणखीन चांगल्या दर्जाची असणार आहे. गॅस लाईनसह नळपाण्याची लाईन टाकताना लाईन फुटल्यास तात्काळ त्यावर उपाययोजना केली जात आहे. आमच लक्ष कामावर असून कामाचा दर्जात तडजोड होणार नाही. गढूळ आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असलेल्या ठिकाणी आता दुरूस्ती करण्यात आल्याने शुद्ध पाणीपुरवठा होत आहे अशी माहिती पाणी पुरवठा सभापती प्रतिक बांदेकर यांनी दिली. यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, महिला सभापती दिलीप भालेकर, सुकन्या टोपले, निलम नाईक, सुनिता पेडणेकर, दुलारी रांगणेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page