⚡सावंतवाडी ता.२४-: शहारत झालेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानीची पाहणी सत्ताधारी नगरसेवकांकडून करण्यात आली. यावेळी आपल्या घराशेजारील जीर्ण व जीविताला धोकादायक वाटत असणाऱ्या झाडांची माहिती न.प. ला देऊन ती झाडं मालकांनी तोडून घ्यावीत, जेणेकरून हानी पोहचू नये असे आवाहन सभापती सुधीर आडीवरेकर यांनी केले.
श्री. आडीवरेकर म्हणाले, रात्रीच्या वादळामुळे चार घरांवर झाड पडली आहेत. तीन ठिकाणी पोल पडले असून विद्युत प्रवाह खंडित झाला. जवळपास २५ झाड पडल्याची नोंद असून सर्व झाड हटविण्याच काम युद्धपातळीवर सुरू आहे. रस्ते मोकळे करून देण्यात आलेत. शहरातली विठ्ठल मंदिर परिसरात घरावर झाड पडून झालेल्या नुकसानीची पाहणी सत्ताधारी नगरसेवकांकडून करण्यात आली. विठ्ठल मंदिर परिसरात घरावर पडलेल्या नुकसानीची पाहाणी करून पंचनामा करण्यासाठी प्रशासनाला सुचना देण्यात आल्या.यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, दिपाली भालेकर, निलम नाईक, दुलारी रांगणेकर, उद्यान पर्यवेक्षक गजानन परब, सुमित वाडकर, साई परब, राशी परब आदी उपस्थित होते.
