वेंगुर्लात उद्यापासून दोनदिवशीय स्वच्छता लीग क्रीडा स्पर्धांचे आयोजन…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते उदघाटन

⚡वेंगुर्ला ता.१७-: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्रातील नगरपरिषदा / नगरपंचायतींचे लोकप्रतिनिधी व अधिकारी / कर्मचारी यांच्या स्वच्छता लीग क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धा शनिवार दिनांक 18 एप्रिल व रविवार दिनांक 19 एप्रिल रोजी मेजर ध्यानचंद्र क्रीडांगण, कॅम्प-वेंगुर्ला येथे संपन्न होणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग नगरविकास शाखेचे जिल्हा सह आयुक्त विनायक औंधकर हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी 100 मीटर धावणे, क्रिकेट, बॅडमिंटन, गोळाफेक, महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धा, कॅरम, बुद्धिबळ, जलतरण आदी स्पर्धा संपन्न होणार आहेत.
तरी या स्पर्धेवेळी उपस्थित रहावे, असे आवाहन वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर व मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page