सायंकाळी सव्वासहाची घटना: चालकास दशावतार कलाकार किरकोळ जखमी..
सावंतवाडी : येथिल माजी मंत्री भाईसाहेब समाधी स्थळाजवळ टाटा मॅजिक व आयशरमध्ये अपघात झाला. सुदैवाने यात मोठी दुर्घटना झाली नसून चालकासह गाडीतल प्रवासी जखमी झालेत.
दशावतार नाट्यप्रयोगासाठी टाटा मॅजिक गाडीतून हे कलाकार जात असताना माजगाव येथील भाईसाहेब सावंत समाधिस्थळी हा अपघात झाला. यात चालक जखमी झाला असून दशावतार कलाकारांना किरकोळ दुखापत झाली आहे. समोरून येणाऱ्या आयशरला धडक बसल्याने हा अपघात झाला असून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.
