मळेवाड जकात नाका येथे अज्ञात व्यक्तीने लावली आग…

मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला..

⚡सावंतवाडी ता.१४-: मळेवाड जकात नाका येथे आज दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीमुळे येथील ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली. मळेवाड शाळा नंबर १ जवळील जागेत अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली .मात्र येथील स्थानिकांच्या अथक प्रयत्नांने ही आग विझविण्यात आली. ही आग वेळीच विझवली नसती तर,बाजूला असलेल्या शाळा,तसेच काजू बागेची मोठी हानी होऊन अनर्थ घडला असता.
सदरची आग लागली हे लक्षात येताच काही जागृत ग्रामस्थांनी मुरकरवाडी व नाईकवाडीतील काजू बागायदार मालकांना घटनेची माहिती दिली.यावेळी तेथे स्थानिकांनी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केला.मात्र वेळीच आग विझविल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

You cannot copy content of this page