केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची माड्याचीवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठाला भेट…

⚡कुडाळ ता.१२-: तालुक्यात माड्याचीवाडी येथील श्री स्वामी समर्थांच्या मठाला आज केंद्रीय उर्जा मंत्री ना श्रीपाद नाईक यांनी भेट देऊन दर्शन घेतले. मठाचे संस्थान प्रमुख श्री श्री गावडे काकांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन ना श्रीपाद नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज माड्याचीवाडी येथील श्री स्वामी मठाचे प्रमुख गावडे काका यांच्या अलीकडेच झालेल्या वाढदिवसानिमित्त आज सदीच्छा भेट दिली आणि संस्थानच्या वतीने चाललेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती घेतली. तसेच विशेष म्हणजे 86 कृष्ठरोगी यांच्यावर यशस्वी उपचार केले होते व पौष्टिक आहार देण्यात आला होता, या समाजोपयोगी कामाचे ना नाईक यांनी कौतुक केले.
यावेळी नेरुर देऊळवाडा दक्षिण मतदारसंघातुन पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्या बद्दल सौ अर्चना अतुल बंगे यांचा सन्मान मठाचे श्री गावडे काका यांनी सत्कार केला.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे मठाचे, अध्यक्ष एकनाथ गावडे, संचालक सुजय गावडे, पंकज कामत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page