डिंगणे शाळेत १८ एप्रिलला माजी विद्यार्थी स्नेहमेळावा व ‘सांस्कृतिक कलामंच’ उद्घाटन…

⚡बांदा ता.११-: डिंगणे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आणि ‘सांस्कृतिक कलामंच’ उद्घाटन सोहळा शनिवार, दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम (दादा) साईल, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, सावंतवाडी पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, सदस्य प्रियंका देसाई तसेच शिवगणेश प्रॉडक्शनचे गणेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या ऐतिहासिक साधनांच्या प्रदर्शनाने होणार असून सकाळी ९ वाजता आजी/माजी शिक्षकांचा सत्कार, सकाळी १० वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ८ वाजता रंगमंच उद्घाटन व मान्यवरांचे स्वागत सत्कार सोहळा होणार आहे. कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणून रात्री ९ वाजता शिवगणेश प्रॉडक्शन, मुंबई–सिंधुदुर्ग यांच्याकडून ऐतिहासिक नाट्यप्रयोग ‘इथे ओशाळला मृत्यू’ सादर केला जाणार आहे.
या स्नेहमेळाव्याच्या आयोजनासाठी माजी विद्यार्थी समिती तसेच शाळा व्यवस्थापन समितीने विशेष परिश्रम घेतले असून परिसरातील सर्व माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नाना सावंत, उपाध्यक्ष यशवंत डिंगणेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भास्कर सावंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page