मेणबत्ती आणि ताड पत्रीचे केले वाटप
*मालवण-:* तौक्ते चक्रीवादळात देवबाग गावाला मोठा तडाखा बसून तेथील ग्रामस्थांचे वादळी वारा तसेच समुद्री उधाणामुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे देवबाग गावातील अशा नुकसानग्रस्त ग्रामस्थांना लायन्स क्लब मालवणने मदतीचा हात पुढे केला असून नुकसानग्रस्त ग्रामस्थांना लायन्स क्लब तर्फे ताडपत्री व मेणबत्तीचे वाटप करण्यात आले. देवबाग ग्रामपंचायत येथे नुकसानग्रस्तांना ही मदत सुपूर्द करण्यात आली. यात ४० ग्रामस्थांना ताडपत्री देण्यात आली. तसेच देवबाग गावात आठ दिवस लाईट नसल्याने अंधारात राहणाऱ्या ग्रामस्थांसाठी मेणबत्ती बॉक्सचेही वाटप करण्यात आले. यावेळी लायन्स क्लबचे सदस्य उमेश नेरुरकर, महेश अंधारी, अवधूत चव्हाण, विश्वास गावकर, उदय घाटवळ, गणेश प्रभोलकर तसेच देवबागचे सामाजिक कार्यकर्ते मनोज खोबरेकर, ग्रा.प.सदस्य कर्मचारी आदी उपस्थित होते.
