⚡वेंगुर्ले ता.०९-: कांदळवन विभाग दक्षिण कोकण वनपरिक्षेत्र (कांदळवन) मालवण यांच्या विद्यमाने शुक्रवार दिनांक १० एप्रिल रोजी “कासव महोत्सव २०२६” चे आयोजन वेंगुर्ले वायंगणी बीच वर करण्यात आले आहे.
या महोत्सव कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून मंत्री मत्स्य व्यवसाय व बंदरे महाराष्ट्र तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे असून,प्रमुख अतिथी म्हणून लोकसभा सदस्य सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदार संघाचे नारायण राणे तसेच विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अध्यक्ष प्रमोद कामत,विधान परिषद सदस्य ॲड. निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य दीपक केसरकर, निलेश राणे उपस्थित राहणार आहेत.
तर प्रशासकीय प्रमुख डॉ .रविकिरण गोवेकर(अपर प्रधान मुख्य वनरक्षक ,कांदळवन कक्ष मुंबई), श्रीलक्ष्मी ए ( भा. व. से.).मुख्य वनरक्षक ,कोल्हापूर, तृप्ती धोडमिसे,जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, रविंद्र खेबुडकर मुख्यकार्यकारी अधिकारी, डॉ.मोहन दहीकर पोलीस अधीक्षक, मिलिश शर्मा उप वनरक्षक वनविभाग सावंतवाडी, मधुमिता एस.उपवनरक्षक कांदळवन कक्ष मुंबई ,कांचन पवार विभागीय वनाधिकारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाचे स्वरूप :-सकाळी ७:३० वाजता मान्यवरांचे आगमन व स्वागत, स.८ वाजता नवजात समुद्री कासव पिल्लांना मान्यवरांच्या हस्ते समुद्रात सोडणे,सकाळी ८:३० वाजता मान्यवरांचे हस्ते वाळू शिल्पाचे फित कापून उद्घाटन करणे, सकाळी ९ वाजता कार्यक्रमांचे प्रास्ताविक,९:३० वाजता कासव संवर्धनामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कासव मित्रांचा सन्मान,९:४५ कासव संवर्धना बाबत मार्गदर्शन,१० वाजता मान्यवरांचे मनोगत,१०३० वाजता आभार प्रदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या “कासव महोत्सवाला” सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहनकांदळवन विभाग दक्षिण कोकण वनपरिक्षेत्र कांदळवन यांनी केले आहे.
