⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला तालुक्यातील आरवली सोन्सूरे येथील वाळूशिल्पकार रविराज अर्जुन चिपकर यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली येथे त्यांच्या निवासस्थानी आकर्षक वाळूशिल्प साकारले आहे. यासाठी त्यांना 5 तास एवढा कालावधी लागला आहे. ते गेली 15 वर्षे वेंगुर्ला तालुक्यात व सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आकर्षक वाळूशिल्प साकारत असून त्यांच्या या कलेचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.
आरवलीतील वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांची अप्रतिम कलाकृती…
