१०० हुन अधिक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई_
*💫बांदा दि.२४-:* मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली तपासणी नाका येथे बांदा पोलिसांनी आज सायंकाळी अचानक नाकाबंदी केली. यावेळी तासाभरात विनाकारण फिरणाऱ्या १०० हुन अधिक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अचानक केलेल्या या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने होत आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव व बांदा पोलिसांकडून जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या आदेशाची आज कडक अंमलबजावणी करण्यात आली. इन्सुली तपासणी नाक्यावर आज सायंकाळी अचानक वाहनांची कसून चौकशी करून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला.
