शहरात १ तर ग्रामीणात ४०
*💫सावंतवाडी दि.२४-:* तालुक्यात आज ४१ नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात ४० रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात वैश्यवाडा येथे १ रुग्ण सापडला आहे तर ग्रामीण भागात ओटवणे १, निरवडे १, चौकुळ ७, आंबोली ३, मळेवाड २, मळगाव १, कलंबिस्त ८, माजगाव १, कोलगाव ६, बांदा ३, इन्सुली १, सांगेली ३, कारीवडे १, माडखोल १, वेत्ये १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत ५३६ रुग्ण सक्रिय आहेत.
