अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची माहिती_
*💫सिंधूदुर्गनगरी दि.२४-:* वादळामुळे बाधित झालेल्या वीज यंत्रणेचा आता बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या अभियंते, वीज कामगार तसेच स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने पुन्हा उभी करण्यासाठी महावितरण कंपनी प्रयत्न करत आहे. सध्या कोणत्याही परिस्थितीत रिंग फीडिंग, बायपास आदी प्रकरणी सर्व म्हणजे 31 पैकी 31 उपकेंद्रे पहिल्या दोन दिवसातच सुरू करण्यात आली आहेत. आता उपकेंद्र पासून ट्रान्सफॉर्मर पर्यंत पोचणारी 11 की वो. वहिनी चे 100 फिडर सुरळीत केले जात आहेत. आज दुपार पर्यंत 100 पैकी 100 म्हणजेच 100% फिडर सुरळीत सुरू झाले आहेत. यामुळे गावोगावी , वाडी वस्तीवरील ट्रान्सफॉर्मर विद्युत भरित झाले आहेत. यामुळे 439 पैकी 432 गावात वीज पुरवठा पुन्हा एकदा सुरू करण्यात यश आले आहे. तथापि अजूनही काही पोल बदलणे, वीजेच्या तारा बदलणे ही कामे सुरूच असल्याचे जागोजागी दिसून येत आहे. यामुळे महावितरण कंपनीने आता वाडी वस्तीवरील वीज ग्राहकांना संपर्क यंत्रणा सुरू केली आहे. त्यानुसार आता ग्राहकांनी आपल्या उपविभागाचे प्रमुख यांच्याशी संपर्क करणे सोयीचे होईल. कुडाळ श्री पाटील फोन नंबर 7875765140 सावंतवाडी श्री भुरे 7875765143 वेंगुर्ला श्री खटावकर 7875765142 ओरस श्री तरापुरे 7875765141 दोडामार्ग श्री पाटील 7875765141 कणकवली श्री नलावडे 7875765082 आचरा श्री मुगडे 7875765098 मालवण श्री साखरे 7875765130 देवगड श्री शेख 7875765085 वैभववाडी श्री सूर्यवंशी 7875765084 वरील सर्व अधिकाऱ्यांना ग्रकाहांच्या तक्रारी असल्यास कळवण्यात यावे असे आवाहन अधीक्षक अभियंता श्री विनोद पाटील यांनी केल आहे.
