कोंडुरे तिठा येथील “अपघाती खड्डा” बुजविण्याचे काम सुरू…

वाहनचालक, ग्रामस्थांत समाधान..

⚡सावंतवाडी ता.३१-: कोंडुरे तिठा येथील रस्त्याच्या मधोमध पडलेला खड्डा अपघातास कारणीभूत ठरत होता.याबाबत स्थानिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली होती.या खड्ड्याबाबत वृत्तही प्रसिद्ध झाले होते.याबाबत संबंधित बांधकाम विभागाने दखल घेत, अपघाती खड्डा बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले.

कोंडुरे तिठा येथील रस्त्याच्या मधोमधच असलेल्या या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती.तसेच या पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात होऊन गाड्यांचे नुकसानही होत होते.
मात्र रस्त्यावर पडलेला “तो अपघाती खड्डा” बुजविल्याने ग्रामस्थ, वाहनचालकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page