डिंगणे नं.१ शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी…

⚡बांदा ता.२४-: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा डिंगणे नं.१ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. देशभक्तीच्या घोषणा आणि ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या प्रभातफेरीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गावातील नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शिवरायांना अभिवादन केले.
यानंतर कै. हेमलता मनोहर देसाई (ताई) कळणे यांच्या स्मरणार्थ श्री. विलास सोमा सावंत यांच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिवचरित्र, स्वराज्याची संकल्पना आणि शिवरायांचे पराक्रम यांवर प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून चंद्रकांत सावंत (भाई) व विजय शिंदे उपस्थित होते. त्यांचे स्वागत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भास्कर सावंत आणि मुख्याध्यापक कृष्णा गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर यशवंत डिंगणेकर, आदेश सावंत, विजय सावंत, वृषाली सावंत, अमित सावंत, संदेश सावंत, राजेश सावंत, सोमा कदम तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रुंजी सावंत यांनी केले, प्रास्ताविक कु. पायल सावंत यांनी सादर केले तर आभार प्रदर्शन कु. ईश्वरी सावंत यांनी केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
शिवजयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या मनात स्वाभिमान, देशप्रेम आणि आदर्श नेतृत्वाची प्रेरणा जागृत झाली, हीच या कार्यक्रमाची खरी फलश्रुती ठरली.

You cannot copy content of this page