⚡मालवण ता.१८-:
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या एनसीसी विभागामध्ये तिसऱ्या वर्षाला असणाऱ्या NCC कॅडेट -विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला.
यावेळी भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय मालवणचे प्रा पवन बांदेकर यांनी एनसीसी विद्यार्थ्यांनी घरामध्ये सेवा कशी करावी ? समाजामध्ये वावरत असताना स्वच्छतेच्या माध्यमातून तसेच राजकारण, अर्थकारण, समाजकारण आणि संरक्षण दलामध्ये काम करून राष्ट्रभक्ती कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी सिंधुदुर्ग कॉलेजचा एनसीसी विभाग जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात कशाप्रकारे प्रथम असेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे सांगितले.
यावेळी एनसीसी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करत एनसीसीमुळे देश सेवा करायला मिळाली आणि पुढेही आम्ही देश सेवा करत राहू, असे सांगितले. यावेळी उपस्थित डॉ. पंकज दिघे, उद्योजक संजय गावडे यांनीही शुभेच्छा दिल्या. तर या कार्यक्रमास कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सेक्रेटरी गणेश कुशे यांच्यासह इतर पदाधिकारी, संचालक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास प्रा. खोबरे, प्रा. साळुंखे, प्रा. रोहिणी फाटक, प्रा. कदम, सूर्यकांत कदम आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन व्यावसायिक अर्थशास्त्र आणि एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. मल्लेश खोत तसेच एनसीसीचे कॅडेट्स यांनी केले. यावेळी एनसीसीचा केक कापण्यात आला. तर रात्री विद्यार्थ्यांचे स्नेहभोजन, नाईट कॅप व विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम संपन्न झाले.
