⚡मालवण ता.१८-:
मालवण दांडी येथील श्री रामेश्वर मच्छिमार सहकारी सोसायटी मध्ये सभासदांना भेटवस्तू वाटप कार्यक्रम संपन्न झाला. संस्थेला सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या नफ्यातून सभासदांना भेटवस्तू देण्यात आल्या.
या कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजिवी रापण संघाचे सचिव दिलीप घारे, मच्छिमार नेते छोटू सावजी, अखिल महाराष्ट कृती समिती सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष मिथुल मालंडकर तसेच श्रीकृष्ण मंदिर धुरीवाडा अध्यक्ष वसंत गावकर, मच्छिमार नेते प्रदीप मोर्जे, सीमाव रापण संघ देवबागचे सदस्य नादार तुळसकर तसेच आबा वाघ तसेच संस्थेचे मच्छिमार सभासद उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष जगदिश एकनाथ खराडे यांनी केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित सभासदांना भेटवस्तूचे वाटप करण्यात आले. ३१ मार्च २०२५ पर्यंत नोंद झालेल्या सभासदांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत भेटवस्तू घेवून जाण्याचे आवाहन यावेळी संस्थेचे अध्यक्ष जगदीश खराडे यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष हेमंत विजय जोशी, संचालक प्रविण मेस्त, जीवन भगत, पंकज सादये, मुणाली कोयंडे, रुपेश साळगांवकर, संतोष ढोके, तुषार आचरेकर, रविंद्र चांदेरकर, दिलीप पराडकर, अर्चना आचरेकर, अक्षय रेवंडकर आदी उपस्थित होते. शेवटी संस्थेच्या सचिव सौ. सतेजा वायंगणकर यांनी आभार मानले.
