⚡वेंगुर्ला ता.१८-: संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत कोकण विभागीय स्पर्धेत सलग 2 वर्षे पुरस्कार प्राप्त करणार्या वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतिचा कोकण विभागाचे सन्मान 25 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता कोकण विभागाच्या बेलापूर येथील आयोजित कार्यक्रमात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. कोकण विभागीय कार्यालयाकडुन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. परुळेबाजार ग्रामपंचायतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत द्वितीय क्रमांक सन 2019/20 व 2020 21, 2021 22 अशी सलग दोन वर्ष यश मिळवले आहे. सदर कार्यक्रम विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवर यांच्या उपस्थितीत होणार आहे.यावेळी गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, विद्यमान सरपंच, उपसरपंच, सदस्य तत्कालीन सरपंच, उपसरपंच यांनी उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आहे. तसे पत्र ग्रामपंचायतीना प्राप्त झाले आहे.परुळेबाजार सलग दोन वर्षे अभियान अंतर्गत पुरस्कार मिळवणारी जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे.
परुळेबाजार ग्रामपंचायतीचा25 फेब्रुवारी रोजी बेलापूर येथे होणार सन्मान…
