आंबा बागायतदार शेतकरी शिष्टमंडळ उद्या घेणार पालकमंत्री ना. नितेश राणे यांची भेट..

⚡वेंगुर्ला ता.१८-: सद्या होत असलेल्या आंबा नुकसानीबाबत चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील सर्व आंबा बागायतदार शेतकरी व व्यापारी ( करारधारक व्यापारी) यांची एकत्रित बैठक आज बुधवारी दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हा बँक वेंगुर्ले शाखा येथे संपन्न झाली. याबाबत मनीष दळवी यांच्यासमवेत सविस्तर चर्चा झाल्यानंतर
शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ उद्या गुरुवार सकाळी 10 वा. पालकमंत्री ना. नितेश राणे यांची भेट घेण्याचे निश्चित करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा उत्पादक शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडला आहे. अति थंडी, अति उष्णता असल्यामुळे आंबा फळे गळून पडून नुकसान होत आहे. प्रत्येक दिवशी होणाऱ्या नुकसानीमुळे आंबा उत्पादक शेतकरी बागायतदार मेटाकुटीस आले आहेत. याबाबतच्या व्यथा शेतकऱ्यांनी मनीष दळवी यांच्याकडे मांडल्या. यावेळी आंबा – काजू बागायतदार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयप्रकाश चमणकर, छत्रपती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर राय,
रामेश्वर ट्रान्सपोर्टचे जनार्दन पडवळ, आंबा बागायतदार नितीन कुबल, जगन्नाथ सावंत, वीरेंद्र आडारकर, विलास ठाकूर, नगरसेवक दाजी परब, संदेश निकम, प्रीतम सावंत, आडेली पं. स. सदस्य नितीन मांजरेकर, माजी उपनगराध्यक्ष रमण वायंगणकर, पाल येथील बागायतदार कमलेश गावडे, महादेव गावडे, रमेश नार्वेकर आदी व तालुक्यातील अन्य भागातील आंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी मनीष दळवी यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न अग्रक्रमाने सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

You cannot copy content of this page