उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर प्रवीण भोंसले यांचा वाढदिवस कार्यक्रम रद्द…

⚡सावंतवाडी ता.१७-: प्रवीण भोंसले यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दरवर्षी प्रवीण भोंसले मित्र मंडळाच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी सामाजिक व आनंदी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्याची जनता अजूनही दुःखातून सावरलेली नसल्याने हा निर्णय घेतला आहे.

प्रवीण भोंसले यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे, “या वर्षीच्या वाढदिवशी माझे परममित्र महाराष्ट्राचे विकास पुरुष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अत्यंत दुःखदायक निधनामुळे अजूनही महाराष्ट्राची जनता सावरलेली नाही. तथापी या वर्षी मी माझा वाढदिवस साजरा करणे मला योग्य वाटत नाही. कृपया याची सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी.” असे आवाहन प्रवीण भोसले यांनी केले आहे.

You cannot copy content of this page