स्वराज्य संघटना सावंतवाडी यांच्या वतीने १९ रोजी शिवजयंतीनिमित्त भव्य “शिवचेतना” रॅलीचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१७-: स्वराज्य संघटना सावंतवाडी यांच्या वतीने १९ फेब्रुवारी गुरुवारी शिवजयंतीनिमित्त भव्य “शिवचेतना” रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ठीक १० वाजता राजवाडा येथून या रॅलीला प्रारंभ होणार आहे.

छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणारी ही रॅली राजवाडा येथून सुरू होऊन बाजारपेठ मार्गे शहरातून मार्गक्रमण करणार आहे. रॅलीमध्ये घोडे, ढोल-ताशांचा गजर आणि पारंपरिक फेटे बांधून शिवभक्तांचा उत्साही सहभाग असणार आहे. संपूर्ण शहरात शिवमय वातावरण निर्माण करण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे.

१९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वराज्य संघटना सावंतवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page