रेडी जि.प. सदस्य प्रीतेश राऊळ व रेडी पं .स.सदस्य प्रीयांका घाटवळ यांचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.१७-: वेंगुर्ला तालुक्यातील रेडी जि.प. सदस्य म्हणून विजयी झालेले प्रीतेश राऊळ व रेडी पं.स.सदस्य विजयी उमेदवार प्रीयांका घाटवळ यांचा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई व जि.का.का.सदस्य व उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर त्यांच्या हस्ते रेडी येथे सत्कार करण्यात आला. यावेळी रेडी सरपंच रामसिंग राणे, शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर उपस्थित होते.
वेंगुर्ले तालुक्यातील रेडी जि.प मतदार संघ हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो . प्रीतेश राऊळ यांनी सलग दुसर्‍या वेळी या मतदार संघातुन विजय मिळवला . तसेच त्यांनी मागच्या टर्म मध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून चांगली कामगीरी बजाविली. त्यामुळेच मतदारांनी त्यांना पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यांने निवडुन दिले.तसेच रेडी पंचायत समीती मतदार संघातुन नवख्या असलेल्या प्रियांका घाटवळ ह्या संघटनेच्या ताकदीवर निवडुन आल्या. त्यांना पण स्थानिक केरवाडा ग्रामस्थांची साथ लाभली . ह्या दोन्हीही विजयी उमेदवारांचा सत्कार रेडी व शिरोडा – केरवाडा येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन करण्यात आला. यावेळी नितीन तारी, पांडुरंग घाटवळ, शंकर घाटवळ, गोपाळ बटा , नारायण मोरजे उपस्थित होते .

You cannot copy content of this page